नाबार्डच्या अधिकारी वर्गाकडून भिलवडी शिक्षण संस्थेस देणगी
भिलवडी | जि - सांगली
भिलवडी | जि - सांगली
नाबार्ड मुंबई मधील अधिकारी वर्गाकडून भिलवडी शिक्षण संस्थेस दोन लाख त्रेचाळीस हजार रुपयांची देणगी देण्यात आली.नाबार्डचे असिस्टंट जनरल मॅनेजर राजेश सिंग,सुरेश अंबोरकर यांच्या हस्ते मदतीचा धनादेश भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे यांनी स्विकारला.
नाबार्ड ऑफिसर्स असोसिएशन,नाबार्ड एम्प्लॉईज असोसिएशन,नाबार्ड प्रोग्रेसिव्ह वेल्फेअर असोसिएशन मुंबई या संस्थांच्या सयुंक्त विद्यमाने या निधीचे संकलन करण्यात आले.कृष्णानदीच्या महापुरामुळे संस्थेचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी नाबार्डच्या पदाधिकारी वर्गाने खारीचा वाटा मदत म्हणून दिला असल्याचे मनोगत नाबार्डचे असिस्टंट मॅनेजर सुरेश अंबोरकर यांनी व्यक्त केले.
या देणगीबद्दल नाबार्डच्या अधिकारी वर्गाचे भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे यांनी आभार मानून संस्था नव्या उत्साहाने विद्यार्थ्याच्या सर्वांगिण विकासासाठी विविध योजना राबवित असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक व स्वागत भिलवडी शिक्षण संस्थेचे सचिव संजय कुलकर्णी यांनी,सूत्रसंचालन शरद जाधव यांनी तर आभार खाजगी मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुकुमार किणीकर यांनी मानले.यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेचे विश्वस्त जे.बी.चौगुले,संचालक डॉ. सुनिल वाळवेकर, नाबार्डचे सदाशिव डिचोळकर,अनंत तळेकर,एल.पी. धानोरकर,एम.बी.पाटील,आबा माने,साजिद मुलाणी, एस. बी. कोकाटे,श्रीमती पी.ए.पाटील, एस.बी.वग्याणी, सेकंडरी स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.शुभांगी मनवाचार, सौ.छाया गायकवाड, संजय पाटील आदींसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.