राज्यस्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेत क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज बुरुंगवाडीचे उज्वल यश प्राप्त केले आहे.
३ डिसेंबर २०१९ रोजी लातूर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेत सिद्धविनायक शिक्षण प्रसारक मंडळाच्या बुरुंगवाडी ता. पलूस येथील क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज बुरुंगवाडी या सैनिक पॅटर्न निवासी शाळेतीलविद्यार्थी महेश बाजीराव मगदूम याने द्वितीय क्रमांक पटकावला.तो इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत आहे.१७ वर्षे वय व ३५ किलो वजनी गटाच्या विभागात किक बॉक्सिंग स्पर्धेत त्यांने दमदार यश प्राप्त केले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद लातूरच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुलात या स्पर्धा संपन्न झाल्या.अम्यूचर स्पोर्ट्स किक बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष संतोष म्हात्रे व जिल्हा क्रीडाधिकारी महादेव कसगावडे यांच्या हस्ते रौप्य पदक व सन्मानपत्र देऊन महेश मगदूम याचा गौरव करण्यात आला.
विद्यालयाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष मा.सुनिल जाधव व संस्थेच्या कार्यवाह सौ.वनिता जाधव यांच्या हस्ते महेश मगदूम याचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.
त्यास क्रीडा शिक्षक अमोल सपकाळ,वैभव गुरव,विशाल गुरव,नागेश धनवडे,श्रीकांत नाझरे,संदीप नलवडे यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमास प्राचार्या स्वाती पाटील ,मुख्याध्यापिका दिपाली जाधव व सर्व शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते.