मुलांना घडवणारी संस्कारक्षम गोष्टी सांगणारी आई कुठाय? असा सवाल बालभारती पाठ्यपुस्तकातील पाठाचे लेखक, संदीप नाझरे यांनी आपल्या मनोगतातातून व्यक्त केला. पुनवत ता. शिराळा येथील हिंदकेसरी अर्जुनवीर पै. गणपतराव आंदळकर विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानज्योत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पै. मारूतीराव आंदळकर होते.
यापुढे बोलतांना संदिप नाझरे म्हणाले की,इच्छा असुनही व्यक्त न होता येणे,हवं ते न मिळणे,परिक्षेत अपेक्षित यश न मिळणे, प्रेम- मैत्रीत अपयश येणे, एखादी गोष्ट मनासारखी न होणे यामुळे मुलांवर प्रचंड दडपण येत असते. अशावेळी मुलांचा घरात संवाद असणे गरजेचं असतं.
पण पालक बालक संवाद हरवल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगताना दिसते. आजच्या धावत्या जगात पतीपत्नी दोघांनी नोकरी करणे हे बहुदा अनिवार्य होऊन बसलेलं दिसतं. पण यातून पालकांना आपल्या व्यस्त दैनंदिनीतून स्वतः च्या मुलांसाठी स्पेस ठेवता न येणे हा त्या मुलांवर अन्यायच नाही का?आई वडिलांपैकी एकानेतरी मुलाच चांगलं मित्र असायलाच हवं दोघे जॉबला म्हणजे मुलांची वाटचं
त्यांना फक्त पैसा नको असतो तर त्यांच्या हळव्या मनाला पालकांच भक्कम पाठबळ हवं असतं. आजच्या कुटुंब पद्धती मध्ये नेमकं तेच मिळताना दिवस नाही. माझी आई अंगाई म्हणायची, गोष्टी सांगायची. आजची आई टिव्हीवरील आपल्या जगण्याशी सुखदुःखांशी देणंघेणं नसलेल्या मालिका सोडून मुलांकडे बघत नाही. मुलगा दिवसातील आठ तास शाळेत असला तरी सोळा तास घरी असतो. त्यामुळे त्याला घडवण्यात पालकांची जबाबदारी तितकीच महत्वाची आहे. पण समाज बिघडला असं म्हणताना आज हे पण दुर्दैवाने विचारावे वाटते.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष नथुराम पाटील, सचिव दत्ताजीराव आंदळकर, गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, केंद्रप्रमुख मधुकर देवकर, मुख्याध्यापक ए.एच.पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होते.
यावेळी विद्यालयाचा नावलौकिक उंचविणारे माजी विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस स्पर्धा सुवर्णपदक विजेता प्रवीण माने, चित्रकार सचिन रोकडे, आयटीसी शिक्षक पंकज पाटील यांचा सत्कार करण्यात आला.