Sanvad News भिलवडी इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल मध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

भिलवडी इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल मध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी.


भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कुल भिलवडी मध्ये ' साविञीबाई फुले जयंती ' उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका कु.विदया टोणपे व सर्व शिक्षीका उपस्थित होत्या,पाहुण्याच्या हस्ते साविञीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पुजन केले.या कार्यक्रमाचे सुञसंचालन इ.९वी विध्यार्थीनी कु.अस्मिता पाटील हिने किली, तसेच कु.नील वाळवेकर कु.भक्ती रेठरेकर कु.प्रियांका पाटील यांनी भाषणा मधून  साविञीबाई यांच्या विषयी माहीती सांगितली.
इ.३री ची विध्यार्थीनी कु.जान्ही देशपांडे हिने साविञीबाई यांची वेशभूषा केली व माझ्या सर्व लेकी शिकल्या पाहीजेत असा संदेश दिला. प्रमुख पाहुण्यानी साविञीबाईच्या विचारांचे महत्त्व पटवून दिले.
या कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागाच्या शिक्षीका सौ.सारीका किणीकर यांनी केले.

To Top