छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणखी समजावून घेऊन विदयार्थ्यांना सांगण्यासाठी पं. विष्णू दिगंबर पलुस्कर माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी केली रायगड प्रदक्षिणा पूर्ण केली.पलूस येथील विष्णु दिगंबर पलुस्कर माध्यमिक विद्यालयातील इतिहासाचे शिक्षकमा. बाळासाहेब चोपडे व मा. सुनील पुदाले यांनी दुर्गराज किल्ले रायगड या किल्ल्याची प्रदक्षिणा नुकतीच पूर्ण केली. रायगड किल्ला वरून पाहताना काही अपरिचित इतिहास... जसं की नानी दरवाजा सिद नाक स्मारक ,वाघोली ची, खिंड .काळकाईची खिंड ,जिवाजी लाड स्मारक ,औषधी वनस्पती ,मोठाली झाडे ,छ.शिवाजी महाराजांनी रायगडवाडी येथे पर्यावरण संवर्धनासाठी वसवलेली देवराई इत्यादी ऐतिहासिक पाऊलखुणा वरून पाहताना कळत नाही. हे समजून घेण्यासाठी रायगड प्रदक्षिणा १७ किलोमीटरची ,खाचखळग्यांनी युक्त ,अनेक चढ उतार असलेली, रायगडाला चारी बाजूंनी प्रदक्षणा करावी लागते .हा इतिहास समजून घेण्यासाठी सदरची रायगड प्रदक्षिणा शिक्षकांनी पूर्ण केली.या अनुभवाचा ऊपयोग विदयार्थ्यांना मार्गदर्शन करताना नक्कीच होईल. विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.टी.जे.करांडे सर यांचे सहकार्य मिळालेव.संस्थेचे अध्यक्ष मा. उदय परांजपे साहेब यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.