स्वतःचे व विद्यार्थ्यांचे चरित्र घडविण्यासाठी शिक्षकाने त्यागकरायला शिकले पाहिजे. विद्यार्थ्यांना मोठमोठी स्वप्ने दाखवणारे शिक्षकच मोठे असल्याचे प्रतिपादन डॉ. सुनिलकुमार लवटे यांनी केले.
भिलवडी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित शिक्षक उदबोधन कार्यक्रमात "राष्ट्र उभारणीसाठी शिक्षकांचे उत्तरदायित्व"या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. प्रारंभी भिलवडी शिक्षण संस्थेचे विश्वस्त जे.बी. चौगुले यांच्या हस्ते प्राचार्य डॉ.सुनिलकुमार लवटे यांचा सत्कार करण्यात आला.
यापुढे बोलताना डॉ.सुनिलकुमार लवटे म्हणाले की,
काळ जसा बेजबाबदार होतो तशा शिक्षकांच्या जबाबदाऱ्या वाढतात..जपानमध्ये सगळ्यात जास्त लक्ष प्राथमिक शिक्षणावर केंद्रित केल्याने तेथील नागरिकांना स्वयंशिस्त आहे.मात्र भारतातील शासक व लोकप्रतिनिधींना शिक्षणाबद्दल अनास्था वाटत आहे.
यावेळी संस्थेचे संचालक डी.के.किणीकर,संजय कदम,जयंत केळकर,मुख्याध्यापिका सौ.शुभांगी मानवाचार,सुकुमार किणीकर,प्रा.जी.एस.साळुंखे,विद्या टोणपे,स्मिता माने,सौ.सुचेता कुलकर्णी,आदींसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
प्रास्ताविक व स्वागत संस्था सचिव संजय कुलकर्णी यांनी केले,पाहुण्यांचा परिचय मानसिंग हाके यांनी केला.आभार प्राचार्य डॉ.एस.बी.चव्हाण यांनी मानले.