भिलवडी ता. पलूस येथील भिलवडी शिक्षण संस्थेस संचालक मंडळातील सदस्यांनी एक लाख छप्पन हजार रुपयांची देणगी दिली.या दात्यांचा भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भिलवडी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब चोपडे यांनी ६५,००० रुपये,संचालक डॉ. सुनिल वाळवेकर यांनी ५१,००० रुपये,संचालक दादासाहेब कालाप्पा चौगुले यांनी २०,००० रुपये,संचालक संजय कदम यांनी २०,००० रुपये अशी देणगी दिली.भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे यांनी या देणगीचा स्विकार केला.संस्थेच्या वतीने सर्व देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेचे विश्वस्त जे. बी. चौगुले, डॉ. सुहास जोशी,संचालक दादासाहेब चौगुले, डी.के.किणीकर,व्यंकोजी जाधव,जयंत केळकर, सर्व विभागाचे विभागप्रमुख,प्राचार्य, मुख्याध्यापक उपस्थित होते.संस्थेचे कार्यवाह संजय कुलकर्णी यांनी आभार मानले.