जिल्हा परिषद शाळा शेरीमळा,(आमनापूर) व अंगणवाडी ता. पलूस जि. सांगली येथे हँडवॉश स्टेशन व मुलामुलींचे स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याची टाकी व नळ यांचे उदघाटन मॅथ्यू मंटम सी. वाय. डी. ए. पुणे यांच्या हस्ते झाले.
ऑगस्ट 2019 मध्ये कृष्णा नदीला आलेल्या महापुरामध्ये जिल्हा परिषद शाळा शेरीमळा ( आमनापूर) व अंगणवाडी येथील मुलामुलींच्या स्वच्छतागृहाचे प्रचंड नुकसान झाले होते. यासाठी सी वाय डी ए पुणे यांनी आर्थिक सहकार्य केले व प्रकाश शिक्षण प्रसारक संस्था ,तासगाव यांनी अंमलबजावणी केली. हे काम चांगल्या प्रकारे केल्याबद्दल मा. सरपंच श्री. विश्वनाथ सूर्यवंशी व शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष व सदस्य तसेच ग्रामस्थ यांनी संस्थेस मानचिन्ह देऊन सत्कार केला. या कामास मा. मुख्याध्यापक श्री . धर्मेंद्र चांदणे व विठ्ठल गायवाड याचे विशेष सहकार्य लाभले.
या कार्यक्रमास उपसरपंच श्री. अशोक काटे, ग्रामपंचायत सदस्या सौ. मालन गायवाड , माजी सरपंच आकाराम पाटील , साधना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. सुरेश पाटील , शाळा व्ययस्थापन समिती अध्यक्ष श्री. निवृत्ती यादव , युवक उपस्थित होते. तसेच पलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. राहुल रोकडे साहेब व गट शिक्षणाधिकारी श्री. प्रसाद कालगावकर साहेब यांचे मार्गदर्शन लाभले.