Sanvad News शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची त्रैमासिक सह विचार सभा संपन्न.

शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची त्रैमासिक सह विचार सभा संपन्न.


 महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक परिषद सांगली या संघटनेच्या जिल्हा कार्यकारणी ची त्रैमासिक सहविचार सभा शिक्षण सेवक सोसायटी सांगली येथे उत्साहात संपन्न झाली.
यामध्ये शाळा व शिक्षकांच्या  प्रलंबीत  प्रश्नावरती चर्चा करण्यात आली.फंडाच्या तसेच डी. सी. पी.एस.च्या पावत्या मिळवून देणे,शिक्षकांची वैद्यकीय बिले,विविध वेतनश्रेणीतील फरक बिले आदी प्रशासकीय पातळीवर विविध प्रलंबीत कामाचा पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्याचे एकमताने ठरवले.वाढत्या उन्हाळ्यामुळे सर्वत्र तापमान वाढत असल्याने विद्यार्थ्यांना उष्माघात सहन करावा लागत आहे.यामुळे सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी व नगरपालिका शिक्षण मंडळाकडे सकाळ सत्रात शाळा भरविण्या बाबत मागणी करण्याचे ठरले.एप्रिल महिन्यात सांगली येथे शिक्षक परिषदेचा भव्य असा जिल्हास्तरीय मेळावा घेण्याची ही घोषणा करण्यात आली.
      यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष राजाराम व्हनखंडे,सांगली जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कटारे, सचिव संतोष जाधव,उपाध्यक्ष नितेंद्र जाधव,मनपा अध्यक्ष  उदयसिंह भोसले,कार्यवाह बाळासाहेब बुरुटे,सरचिटणीस प्रविण खोत,संघटनमंत्री  विजय काटकर, पलूस तालुका अध्यक्ष  शरद जाधव,मिरज तालुका अध्यक्ष अनिल उमराणी,मुख्याध्यापक सेलचे अध्यक्ष युवराज साठे, गजानन पाटील, महिला आघाडी अध्यक्षा संगिता पाटील,सुनिता जगदाळे,अर्चना वाळवेकर,शिक्षक परिषदेचे पदाधिकारी अहिरे मॅडम, सुनिल गवळी,पवार सर , कवाळे सर, संदिप सर, व इतर मान्यवर मोठया संखेने उपस्थित होते.
To Top