Sanvad News यशवंत च्या बालचमुनी प्रलयंकारी पुराचे हुबेहूब प्रदर्शन करून उपस्थितांचे डोळ्यात आणले पाणी;पलूस येथे सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात..

यशवंत च्या बालचमुनी प्रलयंकारी पुराचे हुबेहूब प्रदर्शन करून उपस्थितांचे डोळ्यात आणले पाणी;पलूस येथे सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात..


             पलूस येथील यशवंत शिक्षण संस्थेच्या यशवंत प्राथमिक विद्यालयाच्या स्नेहसमेलनाच्या निमित्ताने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात  या विद्यालयातील सर्वच मुला मुलींनी  सादर केलेल्या सर्वच कार्यक्रमात उपस्थित प्रेक्षकांची दाद तर मिळवलीच परंतु सांगली कोल्हापूर जिल्ह्यावर महा प्रलयंकारी महापूर येऊन गेला त्याच्या आठवणी अजून ताज्या असताना महापूर आल्यावर जनजीवन कसे उध्वस्त झाले लोकांचे प्रपंच  कसे उध्वस्त झाले मिल्ट्री असो वा पोलीस किव्हा सामाजिक संस्था यांनी मदत कशी केली याचे हुबेहूब देखावा बालचमुनी सादर केला व उपस्थित पालक नागरिक यांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या.

सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता यशवंत शिक्षण संस्थेचे सचिव यशवंत कदम सल्लागार संचालक संजय माने यांचे हस्ते करण्यात आला सुरवाती पासून विद्यालयाच्या पबालचमुनी आपल्या अंगी असलेल्या सांस्कृतिक गुणांचे अतिशय देखणे प्रदर्शन केले यामध्ये  चित्रपट गीत कॉकटेल संगीत लावणी या गाण्यावर उपस्थित पालक व नागरिकांना ठेका ठरायला लावला  वारकरी दिंडीचे हुबेहूब प्रदर्शन करताना संत ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम महाराज भक्त पुंडलिक संत गोरा कुंभार यांच्या विठ्ठल भक्तीच्या ज्या अख्यायिता सांगितल्या जातात त्याचे अगदी जसेच्या तसे प्रदर्शन करून जणू वारकरी दिंडी अवतरल्याचा भास निर्माण केला त्याचा बरोबर कराटे या खेळाचे अतिष उत्कृष्ट प्रदर्शन केले कार्यक्रमाचे शेवटी शिवराज्याभिषेक सोहळा सादर करून वंदेमातरम ने सांगता करण्यात आली.

 या कार्यक्रमाचे सर्व नियोजन नृत्य विशारद किरण थोरात सर यांनी केले तर त्यांना प्रशालेच्या मुख्याद्यापीका प्रतिभा पवार अमर कांबळे सागर मडपती प्रियदर्शनी जाधव मीनाक्षी विभूते  मीनाक्षी माळी जयश्री भोसले जयश्री सुर्वे सविता उगळे वंदना लुपणे स्नेहल पाटील यांनी परिश्रम घेतले.

To Top