Sanvad News भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयात पदवी प्रदान कार्यक्रम..

भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयात पदवी प्रदान कार्यक्रम..


      स्पर्धेच्या युगात व्यवसाय व नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. पदवीतून मिळालेल्या ज्ञानाला विचारांची,व्यवहाराची जोड देऊन तुम्ही व्यवसायिक बना. स्वतः नोकऱ्या शोधण्यापेक्षा तुम्ही इतरांना नोकऱ्या देणारे बना असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ.बी.एम. हिर्डेकर यांनी केले.

 भिलवडी शिक्षण संस्थेच्या भिलवडी ता. पलूस येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयामध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे होते.शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ.सी.टी.कारंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
         

कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वास चितळे म्हणाले की,आयुष्यात कोणतीही गोष्ट प्रामाणिकपणे व प्रयत्नात सातत्य ठेवून केल्यास  निश्चित यश मिळते.तुम्ही कोणत्या शाखेची पदवी घेता याहीपेक्षा व्यवहारात ज्ञानाचा वापर कसा करता हे म्हत्वाचे आहे.


        महाविद्यालयातील कला व विज्ञान विभागातील स्नातकांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आल्या.
या कार्यक्रमास संस्था सचिव संजय कुलकर्णी,विश्वस्त जे.बी.चौगुले,संचालक डी.के.किणीकर,जयवंत केळकर, दादासाहेब चौगुले यांच्यासह पदवी प्राप्त स्नातक, विद्यार्थी, प्राध्यापक, पालक, ग्रामस्थ, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
         
प्रभारी प्राचार्य डॉ.श्रीकांत चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.ए.एन.केंगार यांनी,
सूत्रसंचालन प्रा.एस.डी.कदम  यांनी तर, डॉ.डी.पी.खराडे यांनी आभार मानले. 
To Top