पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांनी एन. एम.एम.एस. परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान पटकावून यश मिळवले.इ 8 वी NMMS परीक्षेत गुणवत्ता यादीत विद्यार्थी कु. प्रांजली बाळासाहेब पाटील,कु.तनुजा विलास कोळेकर,कु.अनुराधा अरुण माळी,आदित्य प्रदीप पवार यांनी स्थान पटकावले
संस्थेच्या वतीने इ 8 वी NMMS परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या सर्व विद्यार्थी व पालकांचे त्यांच्या घरी जाऊन हार्दिक अभिनंदन केले. सर्व विद्यार्थ्यांचा, पालकांचा सत्कार करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक टी.जे.करांडे , विभाग प्रमुख गजानन पाटील , वर्गशिक्षक बाळासाहेब चोपडे ,मिंलीद शिरतोडे सुनिल पुदाले, संदीप सावंत सर्व शिक्षक सहकारी उपस्थित होते.
सर्व मार्गदर्शक शिक्षक ,पालक यांचे संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे ,उपाध्यक्ष सुनिल रावळ ,सचिव जयंतीलाल शहा,सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक टी.जे. करांडे सर्व सहकारी यांनी अभिनंदन केले.पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक7Uल विद्यालयाच्या यशात आणखी एक मानाचा तुरा ओवला आहे असे मुख्याध्यापक टी.जे करांडे यांनी सांगितले