भिलवडी शिक्षण संस्थेच्या बाबासाहेब चितळे महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन संपन्न झाला.हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन श्री. मोहन पाटील सरांच्या हस्ते करून राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करणेत आला.
यावेळी क्रीडा प्रशिक्षक डॉ. महेश पाटील, प्र. प्राचार्य डॉ. श्रीकांत चव्हाण सर, श्री. रघुनाथ हिरुगडे श्री. सुरज पाटील, श्री. कुडाळकर सर, डॉ कदम एस.डी. डॉ. विनोदकर सर, प्रा. विश्वास यादव सर उपस्थित होते.
या वेळी प्र. प्राचार्य डॉ. चव्हाण म्हणाले की,कोरोना काळातही योग्य ती खबरदारी घेऊन खेळ करावा. ह्या महामारीला खेळामुळे अटकाव होऊ शकतो. योग्य आहार, व्यायाम व नियमांचे काटेकोर पालन केल्यास आपले आरोग्य चांगले राहू शकते.
यावेळी बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील सर्व खेळाडू, सेकंडरी स्कुल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजचे खेळाडू, प्रशिक्षक, श्री. सुरेश धोतरे उपस्थित होते.