सध्या जगामध्ये कोरोनासारख्या महामारीने थैमान घातल्यामुळे कोरोनाचा पादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाने सर्व शाळा, महाविद्यालय बंद केलेले आहेत. त्यामुळे शिक्षक आणि मुले यांचा प्रत्यक्ष संबंध कमी झाल्यामुळे मुलांचा शैक्षणिक विकास काहीअंशी कमी होत आहे. पालकांनी प्रयत्न केल्यास मुलांची होणारी शैक्षणिक हानी कमी होऊ शकते, त्यासाठी सध्याच्या कोरोना काळात पालकांनी पालक बनून न राहता, पाल्यांचे मित्र बनून राहावे असे आव्हान सांगली जिल्हा शिक्षक संघांचे जिल्हा उपाध्यक्ष मा. बसवराज येलगार यांनी व्यक्त केले. पालकांनी या काळात मुलांना योग्य समझून घेऊन त्यांच्याशी सवांद साधणे आवश्यक आहे. मुलांना संस्काक्षम पुस्तके आणि शालेय अभ्यासक्रमातील पुस्तके वाचन करण्यास साठी प्रोत्साहन देऊन त्यांना आवश्यक असेल तर मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. मुलासमोर कायम नकारात्मक बोलणे टाळावे. त्यांच्यावर अधिकारपणा गाजवू नये. मुलासमोर कायम प्रसन्न आणि आनंदी राहावे. मुलांनी चांगले कार्य केले तर त्याचे कौतुक करावे. अश्या प्रकारे मुलासोबत आपण मित्रासारखे आचरण केलेस मुलांची प्रगती होईल आणि त्यांचा गुणवत्ता विकासात सुद्धा वाढ होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.