Sanvad News विनाअनुदानित शिक्षकांच्या पदयात्रेला खाजगी प्राथमिक शिक्षक परिषदेचा पाठींबा..

विनाअनुदानित शिक्षकांच्या पदयात्रेला खाजगी प्राथमिक शिक्षक परिषदेचा पाठींबा..


विनाअनुदानितक्षकांच्या न्याय  हक्कासाठी सांगली ते बारामती अशी पदयात्रा सुरू आहे.या पदयात्रेला महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक परिषद सांगली यांच्याकडून पाठींबा देण्यात आला.विनाअनुदानित शिक्षकांच्या लढाईत महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक परिषद सैदेव आपल्यासोबत आहे.आपण सर्वांनी मिळून ही लढाई जिंकूया असे मनोगत खाजगी प्राथमिक शिक्षक परिषदेचे सांगली जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कटारे यांनी केले.


 विनाअनुदानित  शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी खंडेराव जगदाळे सर(कोल्हापूर), प्रमोद पाटील सर(सांगली) यांच्या नेतृत्वाखाली प्रदीर्घ लढा चालू आहे.या लढल्यास महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नेते  भगवान आप्पा साळुंखे यांच्या मार्गदर्शना खाली सांगली जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कटारे सर, मार्गदर्शक चंद्रकांत दादा चव्हाण, सिद्राम देवकूळे सर, मुबारक मुल्ला सर या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली.दादोजी कोंडदेव सैनिक शाळा तासगांव येथे या दिंडीतील सहभागी शिक्षक वारकऱ्यांचे बुके देऊन स्वागत केले.    त्यांच्या पदयात्रेला हेतू सफल व्हावा यासाठी सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी व सर्व शिक्षक बंधू भगिनीं च्या वतीने शुभेच्छा दिल्या. 


तासगाव येथील पदयात्रेत सहभागी शिक्षकांच्या मुक्कामाची व जेवनाची सर्व व्यवस्था खाजगी प्राथमिक शिक्षक परिषद सांगली  यांच्याकडून करण्यात आली. शिक्षक परिषदेच्या पदाधिकारी प्रत्यक्ष या दिंडीत सहभागी झाले व  या लढल्यास जाहीर पाठिंबा दिला.
To Top