Sanvad News डीसीपीएस शिक्षकांच्या कामासाठी जुन्या पेन्शन मधील शिक्षकांची मदत;शिक्षक संघाच्या 2009 पासूनच्या पाठपुराव्याला यश.

डीसीपीएस शिक्षकांच्या कामासाठी जुन्या पेन्शन मधील शिक्षकांची मदत;शिक्षक संघाच्या 2009 पासूनच्या पाठपुराव्याला यश.

अंशदान कपात योजनेच्या हिशोब
 चिठ्ठ्या लवकरच मिळणार.

1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती योजना 31 ऑक्टोबर 2005 च्या शासन निर्णयान्वये सरकारने लागू केली. नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती 7 जुलै 2007 च्या शासन निर्णया द्वारे सांगण्यात आली. या शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारातून 1 नोव्हेंबर 2005 पासून दहा टक्के कर्मचाऱ्याचा हिस्सा कपात करण्यात येऊ लागला. सदर कपात केलेल्या रक्कमेचा हिशोब दर वर्षी हिशोब पावती देऊन कर्मचाऱ्यांना कळविणे व त्याच्या नोंदी जिल्हा परिषद स्तरावर ठेवणे अपेक्षित असताना 2014 पर्यंत कोणताही हिशोब कर्मचाऱ्यांनादेण्यात आला नव्हता. शिक्षक संघाच्या वतीने  जिल्हाध्यक्ष मुकुंद सूर्यवंशी व सरचिटणीस अमोल माने यांच्याकडून सन 2011 पासून सदर विषयाचा जोरदार पाठपुरावा करण्यात आला. किंबहुना शिक्षक संघाच्या वतीने दोन शिक्षक प्रतिनिधी  सन 2014 ला प्रशासनाच्या मदतीला देण्यात आले व सलग तीन ते चार महिने शिक्षक संघाच्या पाठपुराव्याने अथक प्रयत्न करून अंशदान कपात रक्कमेचा हिशोब व्यवस्थित जुळवून सन 2009 ते सन 2014 पर्यंतच्या हिशोब चिठ्ठ्या तयार करण्यात आल्या व त्याचे वाटप 2014-2015 मध्ये तालुकानिहाय करण्यात आले. टप्प्याटप्प्याने हिशोबातील दुरुस्ती प्रशासनाकडून करण्यात आली.सध्या लॉकडाउनच्या काळात शिक्षक संघाने उर्वरित 2020 पर्यंतच्या हिशोब चिठ्ठ्या साठी पाठपुरावा केला किंबहुना प्रत्यक्ष प्रयत्न करून कार्यकर्त्यांच्या मदतीने प्रशासनाला मदत करण्याचे काम चालू असून अंशदान पेन्शन योजनेतील शिक्षकांसाठी जुन्या पेन्शन योजनेत असणारे शिक्षक मदत करत असताना दिसत आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी, तात्कालीन मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेंद्र गाडेकर ,उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी  राहुल कदम शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे या सर्वांनी विशेष लक्ष घालून 2009 ते 2020 पर्यंतचा अंशदान कपात रक्कमेचा हिशोब अंशदान पेन्शन योजनेतील शिक्षकांना मिळावा या उद्देशाने एक महिन्याची मोहीम राबवून तालुकानिहाय शिक्षकांच्या मदतीने हिशोब  चिठ्ठयांचे काम अंतिम करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांनी सर्व संघटना समन्वय समितीच्या बैठकीमध्ये सांगितल्यानुसार सदर हिशोब चिठ्ठ्या 23 ऑक्टोंबर पासून तालुकानिहाय व वर्षनिहाय वाटप करण्यात येणार आहेत. 2009 पासून च्या शिक्षक संघाच्या पाठपुराव्याला अशाप्रकारे यश प्राप्त झाले असून सदर हिशोब चिठ्ठ्या तयार करण्यासाठी वित्त विभागातील कर्मचाऱ्यांसह, जिल्हा संघाचे सरचिटणीस अमोल माने, विकास वायदंडे, प्रकाश कलादगी,चंद्रकांत कांबळे, किशोर कांबळे, सुधाकर सूर्यवंशी, महम्मदअली जमादार ,प्रशांत पिसे, गजानन डोंबाळे, निलेश कांबळे, वैभव बंडगर, अमोल हंकारे , जिग्नेश्वर काडापुरे, वैभव आंबी अशा अनेक शिक्षकांचे सहकार्य लाभले.
To Top