दिनांक 17 ऑक्टोबर रोजी शिक्षण सेवक सहकारी सोसायटी सांगली येथे महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती यांच्या वतीने विविध पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. मोहंमदिया अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्यु.कॉलेज सांगली येथील वरिष्ठ लिपीक श्री. अब्दुल समद शेख यांना कृतिशील सेवक पुरस्कार, पुणे विभागाचे विद्यमान शिक्षक आमदार श्री. दत्तात्रय सावंत यांच्या शुभ हस्ते देण्यात आला. पुरस्कार वितरण प्रसंगी माननीय आमदार श्री.दत्तात्रय सावंत यांनी आपले विचार मांडले. त्यांनी सांगितले की शिक्षण क्षेत्रामध्ये ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असताना चांगले काम करणाऱ्या शिक्षक व सेवकांचा पुरस्कार देऊन गौरव करणे आवश्यक आहे. पुरस्कार देऊन गौरव झाल्यामुळे शिक्षक व सेवक नव्या उमेदीने काम करण्याची प्रेरणा मिळते, त्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांना अजून जास्त चांगल्या पद्धतीने ज्ञानदानाचे काम करून चांगले विद्यार्थी घडवतात तसेच आमदार श्री. सावंत यांनी सांगितले की इथून पुढील काळात सुद्धा शिक्षकांच्या व सेवकांच्या जिल्हा पातळीवरील, राज्य पातळीवरील समस्या सोडवण्यासाठी आपण तत्पर राहू.
आपल्या शाळेतील वरिष्ठ लिपिक श्री अब्दुलसमद शेख यांना महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती मार्फत जिल्हा स्तरीय कृतीशील सेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला.त्या निमित्ताने मुस्लिम एजुकेशन कमिटी सांगली चे अध्यक्ष,सेक्रेटरी,सर्व संचालक,सर्वसभासद,मुख्याध्यापिका,उपमुख्याध्यापक,पर्यवेक्षक,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जाधव सर यांनी केले तर आभार श्री पाटील सर यांनी मानले. याप्रसंगी सांगली,मिरज,कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.