पुणे ही महाराष्ट्राची शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी आहे,सर्वाधिक पदवीधरांची नोंदणी पुण्यात आहे.या पुण्यनगरीतील बुद्धिजीवी पदवीधर मंडळींना यंदाच्या निवडणूकीत राजकीय पुढाऱ्यांना नव्हे तर आप ला उमेदवार आमदार बनवायचा असून सर्व पदवीधर मंडळींची प्रथम पसंती आम आदमी पार्टीचे उमेदवार डॉ.अमोल पवार यानांच असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.पुणे शहर व जिल्ह्याच्या विविध ठिकाणी येथे आम आदमी पार्टीच्या वतीने पुणे पदवीधर निवडणूक 2020 च्या अनुषंगाने विविध मेळावे,बैठकी संपन्न झाल्या.त्यास अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे.
पुणे येथील प्रभार रोडवरील आपच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक झाली.यावेळी बोलताना डॉ. अमोल पवार म्हणाले की,संपूर्ण देशात पुणे शहराचे महत्व खूप मोठे आहे. पदवीधरांसाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करायची असेल,त्यांच्यासाठी ठोस धोरणे राबवायची झाल्यास भाजप - राष्ट्रवादीच्या संस्थानिक उमेदवारांना हरवण्याची गरज आहे. या निवडणुकीत 'आप' ला अभूतपूर्व यश मिळेल यात कसलीच शंका नाही.
आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी डॉ.अमोल पवार यांना विश्वास दिला की, 'आप'चे पुणे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते पूर्ण ताकदिनिशी कामाला लागले असून यावेळी कोणत्याही परिस्थतीत परिवर्तन अटळ आहे.
पुणे येथील आकुर्डी येथे 'आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघाच्या'वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ.अमोल पवार म्हणाले की, दिल्ली सरकारने जाहिरनाम्यातील 70 पैकी 69 गोष्टी पूर्ण केल्या.बेरोजगारी,जुनी पेंन्शन योजना, सी.एच.बी. प्राध्यापकांचा प्रश्न,कंत्राटी कामगारांचे प्रश्न यासारखे पदवीधरांचे प्रश्न घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जातोय.दिल्ली सरकारने देशात पहिल्यांदाच जुनी पेंन्शन सुरू केली व थर्ड पार्टीला कायमचे उडवून लावत कंत्राटी कर्मचा-यांचा प्रश्न कायमचा मार्गी लावला. त्याच धर्तीवर राज्यातही या पद्धतीने काम करण्यासाठी मी उभा आहे. आम आदमी ला जनतेचा पैसा जनतेवरच खर्च करायचा आहे. प्रस्थापित राजकीय पक्ष हे विधानसभेत हरलेल्या उमेदवारांनाच पुन्हा विधानपरिषदेत संधी देत आहेत. मूळता हा मतदारसंघ बुद्धीजिवींसाठी असतो पण असे घडताना दिसत नाही. गुंड प्रवृत्तींच्या लोकांपेक्षा चांगल्या विचारांची लोकं राजकारण यावीत म्हणून माझी उमेदवारी आहे.