Sanvad News सांगली मनपा क्षेत्रातील शाळांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची भेट;शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर झाली चर्चा.

सांगली मनपा क्षेत्रातील शाळांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची भेट;शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर झाली चर्चा.




महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक परिषद संघटना जिल्हा सांगलीच्या पदाधिकाऱ्यांनी  सांगली महानगरपालिका क्षेत्रातील  खाजगी प्राथमिक शाळांना सदिच्छा भेट दिल्या.
 यावेळी या  खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे वेतनासंदर्भात, वरिष्ठ व निवडश्रेणी, अशा अनेक प्रश्नावर व इतर संस्था व प्रशासकीय अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
संघटनेच्या  सभासद नोंदणी कार्यक्रमास शाळांमधून उस्फूर्त व विक्रमी असा प्रतिसाद मिळाला.संघटनेची सभासद नोंदणी करण्यात आली.सर्वच शाळांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे आदरातिथ्य करून स्वागत केले. सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांनी  शाळा व शिक्षकांच्या न्याय व हक्कासाठी निरपेक्षपणे लढणाऱ्या महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक संघटनेसोबत काम करण्याची ग्वाही दिली.
  महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक परिषद संघटना जिल्हा सांगलीचे मार्गदर्शक चंद्रकांत दादा चव्हाण, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कटारे सर, जिल्हा उपाध्यक्ष  नितेंद्र जाधव सर, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष जाधव सर, जिल्हा प्रवक्ते व सांमिकु मनपा अध्यक्ष उदयसिंह भोसले सर,मा राजाराम वनखंडे सर,संघटन मंत्री विजय काटकर सर,मनपा सचिव हणमापुरे सर ,सागर तावरे सर आदी पदाधिकारी वर्गाच्या शिष्टमंडळाने भेटी दिल्या. 


संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांनी मनोगते व्यक्त केली ,संघटनेची ध्येयधोरणे स्पष्ट केली भविष्यात संघटनेची गरज का आहे हेही स्पष्ट केले.कमळाबाई हरूगडे प्राथमिक शाळा सांगलीवाडी,जीवन शिक्षण मंदिर सांगलीवाडी,नवमहाराष्ट्र प्राथमिक शाळा लक्ष्मीनगर कुपवाड या शाळांना सदिच्छा भेटी देऊन तेथील शिक्षकांच्या अडीअडचणी व प्रलंबित प्रश्न समजून घेऊन चर्चा केली.
यावेळी सौ.विजयारानी साळुंखे मॅडम,सौ.संगिता पाटील मॅडम,श्री संजय कुलकर्णी सर या मुख्याध्याप कांस ह, शिक्षिकवर्ग,संस्थाचालक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
To Top