जिल्हा परिषद शाळेच्या पलूस येथील शाळा नं.1,शाळा नं.2,शाळा नं.3 मध्ये भारताचा प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पलूस नगर परिषदेच्या सन्माननीय नगरसेविका, बांधकाम समिती सभापती मा. स्वातीताई गोंदील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या प्रसंगी तिन्ही शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक-पालक अंगणवाडी सेविका यांची उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रगीत व ध्वजगीता नंतर संविधान प्रास्ताविकाचे वाचन घेण्यात आले.