अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी जिल्हास्तरीय शिक्षक साहित्य संमेलन संपन्न झाले.संमेलनात पुस्तक प्रकाशन, जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण,शिक्षक साहित्यिक गौरव, परिसंवाद, काव्यसंमेलन असे कार्यक्रम घेण्यात आले.
जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार श्री रमेश धोंडीराम हेगडे, साळशिंग मळा -ता.आटपाडी; सौ सुरेखा निवास कांबळे, हरोली-ता.कवठेमहांकाळ; श्री सदाशिव लक्ष्मण फाळके,ढवळेश्वर-ता.खानापूर;श्री जालिंदर आकाराम पाटील, हिंगणगाव खुर्द-ता कडेगाव;सौ सुषमा डांगे, बेडग-ता मिरज;श्री मंगेशकुमार विजयसिंह कांबळे, सागाव-ता.शिराळा; श्रीम कल्पना संभाजी सावंत, अचकनहळ्ळी-ता.जत;श्री शिवाजी रामू मोरे, तासगाव;सौ अंजली पांडुरंग यादव,पेठ-ता.वाळवा;श्री विठ्ठल सखाराम खुटाण,भिलवडी-ता.पलूस; श्री गजानन हणमंत पाटील, शामराव नगर,सांगली यांना प्रदान करण्यात आले.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ अजित पाटील तर स्वागताध्यक्ष साहित्यिक सचिन कुसनाळे हे होते.साहित्यिक श्री अरुण कांबळे बनपुरीकर यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याध्यक्ष श्री नटराज मोरे व विभागीय अध्यक्ष श्री प्रकाश साखरे हे होते.परिसंवादामध्ये होलीयाकार श्री रमेश जावीर, श्री अजित पाटील, श्री विजय जंगम यांनी सहभाग घेतला. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक श्री विजय जंगम हे होते.काव्यसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी श्री मुबारक उमराणी हे होते. तर शिक्षक साहित्यिक सन्मान सोहळा प्रा. गोपाळ कबनूरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
सौ.सुधा पाटील,श्री.मच्छिंद्र ऐनापूरे,सौ. मंदाकिनी सपकाळ, श्री. सचिन कुसनाळे यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.सदर संमेलनामध्ये साहित्यिक सचिन कुसनाळे यांच्या' मी आस्तिक का?'व' विश्ववाद' अशादोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संगीतकार श्री विजय दळवी हे होते.
या सोहळ्याचे सूत्रसंचालन सौ. संजीवनी कुलकर्णी, सौ मनिषा रायजादे, सौ योगिता कवठेकर यांनी केले. तर सौ वंदना हुलबत्ते यांनी आभार मानले.