भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँण्ड ज्युनियर कॉलेज मध्ये एक डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एड्स जनजागृती पोस्टर स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.
यावेळी इ. आठवी ते दहावी पर्यंतच्या पंचवीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने एड्स जनजागृती करणारी चित्रे काढली होती. यामध्ये कु. समृद्धी बिले नववी ब हिने प्रथम क्रमांक पटकाविला. कु. अनुजा गुजर हिने द्वितीय क्रमांक व मनस्वी मोरे हिने तृतीय क्रमांक पटकाविला.
या विजेते विद्यार्थिनींचा ग्रामपंचायत भिलवडीच्या वतीने नवनिर्वाचित सदस्य पृथ्वीराज पाटील, विष्णू कांबळे यांच्या हस्ते रोख रक्कम व गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शुभांगी मन्वाचार, उपमुख्याध्यापक एस. एन कुलकर्णी, पर्यवेक्षक संभाजी माने, जेष्ठ शिक्षक के. आर पाटील सर, प्रमोद काकडे सर, के.डी पाटील सर, नेहरु युवा केंद्राचे महेंद्र साठे, नेहा ठोंबरे, वर्षा ठोंबरे उपस्थित होते.