सन्मान शिक्षण संस्था सुखवाडी संचलित आदर्श प्राथमिक शाळा नागठाणे ता.पलूस येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते व शाखा सल्लागार जयवंत मदने यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल मोरे, रागिणी धनवडे, केशव गायकवाड, मंडले मॅडम,आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक सुनिल मोरे यांनी सूत्रसंचालन रागिणी धनवडे यांनी केले तर आभार केशव गायकवाड यांनी मानले.यावेळी संविधानातील उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.