Sanvad News ग्रामपंचायत निवडणूक मतदानापासून शिक्षकांना वंचित ठेवू नका -शिक्षक संघाने केली प्रशासनाकडे मागणी

ग्रामपंचायत निवडणूक मतदानापासून शिक्षकांना वंचित ठेवू नका -शिक्षक संघाने केली प्रशासनाकडे मागणी



ग्रामपंचायत निवडणूक मतदानापासून शिक्षकांना वंचित ठेवू नका अशी मागणी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने प्रशासनाकडे केली आहे.

जानेवारी २०२१ मध्ये होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान कर्मचारी म्हणून प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. परंतु बहुतांश गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक होत असल्याने त्या गावातील मतदार असणारे शिक्षक निवडणूक प्रक्रियेत गुंतल्यामुळे मतदानापासून वंचित राहतील.
तसेच पोस्टल मतदान द्वारे जर मतदान केले तर बऱ्याच ठिकाणी काही प्रभागांमध्ये एकच शिक्षक मतदान करणार असल्यामुळे ते मतदान गुप्त राहणार नाही. त्यामुळे ज्या ग्रामपंचायती मध्ये निवडणूक होत आहे अशा गावातील मतदार असणाऱ्या शिक्षकांना निवडणुकीचे काम देऊ नये.
अशी मागणी शिक्षक संघाच्या वतीने मिरज प्रांताधिकारी श्री. समीर शिंगटे यांच्याकडे केली.शिक्षक संघाच्या या मागणीला प्रांताधिकारी श्री. शिंगटे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अशा शिक्षकांचे निवडणूक आदेश रद्द करण्याची सूचना संबंधित तहसीलदारांना देण्यात येतील असे सांगितले.

यावेळी विनायक शिंदे, अविनाश गुरव, पोपट सूर्यवंशी, बाजीराव पाटील, सलीम मुल्ला, नितीन चव्हाण, शब्बीर तांबोळी, समाधान ऐवळे, बाळासो  खेडकर,मौलाली शेख यांच्यासह शिक्षक संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
To Top