Sanvad News डॉ.बाबासाहेब आंबेडकर,शाहू,फुले सहकारी रुग्णालय संस्थेची सभा उत्साहात संपन्न.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर,शाहू,फुले सहकारी रुग्णालय संस्थेची सभा उत्साहात संपन्न.


सांगली जिल्ह्यात प्रथमच सहकारी तत्त्वावर स्थापन झालेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर,शाहू,फुले रुग्णालय मर्यादित सांगली या संस्थेची दुसरी सर्वसाधारण सभा सांगली येथे उत्साहात संपन्न झाली. 
महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थापक अध्यक्ष श्री.विश्वनाथ मिरजकर,उपाध्यक्ष किरण गायकवाड, सचिव शशिकांत भागवत,चेअरमन श्री.राजेंद्र कांबळे,व्हा.चेअरमन श्री अजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
आरोग्य यंत्रणा किती महत्त्वाची आहे, हे कोरोनामुळे संपूर्ण जगाला समजले, तशीच दूरदृष्टी ठेवून महाराष्ट्र राज्यनेते आदरणीय विश्वनाथ मिरजकर आण्णांनी सहकारी तत्त्वावर रुग्णालय स्थापन करण्याचे ठरवले. ५१८ इतकी सभासद संख्या असून सर्व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा कारभार आम्ही पदाधिकारी सेवा मानून करीत असल्याची माहिती चेअरमन श्री.राजेंद्र कांबळे यांनी दिली.
 नजीकच्या काळात सर्व सोयीसुविधानी युक्त जागा उपलब्ध झाल्यावर भव्यदिव्य अशा रुग्णालयाचे काम लवकरच सुरू करण्यात येईल.सांगली जिल्ह्यातील शिक्षक व नागरिकांना दर्जेदार अशा आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष श्री.विश्वनाथ मिरजकर यांनी केले. 
संस्थेचा ताळेबंद कार्यकारी संचालक श्री तुकाराम गायकवाड यांनी वाचून दाखवला.संस्थेने कोविड काळात उभारणी केलेल्या कोविड केअर सेंटरचा जमाखर्च व्हा. चेअरमन श्री. अजित पाटील यांनी वाचून दाखवला विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करण्यात आले.
यावेळी सल्लागार मंडळ सर्व सदस्य पार्लमेंटरी बोर्ड अध्यक्ष किसन  पाटील, जिल्हाध्यक्ष श्री.बाबासो लाड आदींसह सर्व संचालक उपस्थित होते.सूत्रसंचालन श्री.संजय रोकडे यांनी केले सौ.कमल आडके यांनी आभार मानले.
To Top