Sanvad News प्राथमिक शिक्षक बँकेने एस.एम.एस.सेवा पूर्ववत सुरु करावी - बसवराज येलगार यांची मागणी

प्राथमिक शिक्षक बँकेने एस.एम.एस.सेवा पूर्ववत सुरु करावी - बसवराज येलगार यांची मागणी


पगारदार नोकराची जवळजवळ 100% वसुली असलेल्या शिक्षक बँकेची एस.एम.एस.सेवा गेल्या अनेक महिन्यापासून बंद आहे.त्यामुळे अनेक शिक्षक बांधवांची गैरसोय होत आहे. सत्ताधारी संचालक मंडळाने अनेक चांगले निर्णय घेतले, असे त्यांचे वैक्तिक मत आहे.मग बँकेची एस. एम. एस.सेवा अनेक महिन्यापासून बंद का आहे असा सवाल शिक्षक संघांचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. बसवराज येलगार यांनी व्यक्त केला. 
शिक्षक संघांचे सांगली जिल्हा अध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सदस्य मा. विनायक शिंदे यांच्या नेतृत्वखालील शिक्षक संघाच्या बैठकीत ते बोलत होते.सभासदकडून एस एम एस सेवा सुविधा पुरावण्यासाठी वर्षाला साठ रुपये घेतले जातात.तरीसुद्धा शिक्षक बँक ही सुविधा देत नाही या पाठीमागे काय गौड बंगाल आहे, याचा उमज शिक्षक सभासद बांधवाना होत नाही. संबंधिताना फोन लावून एस, एम. एस.सेवा अध्यावत करावी, अशी मागणी करण्यात आली पण सामान्य शिक्षक सभासदांची दखल सत्ताधारी संचालक घेताना दिसून येत नाही.
तसेच एस. एम. एस.सेवेबरोबर सभासदांचे पूर्ण कर्ज किती शिल्लक आहे, शेअर्स आणि कायम ठेव किती शिल्लक आहे याची माहिती या एस. एम. एस सेवेबरोबर सभासदांना देण्यात यावी, बँक बॅलन्सची माहिती घेण्यासाठी विशिष्ट नंबर आहे, त्या नंबरला फोन लावल्यास हा नंबर अवैध्य आहे असा संदेश सभासदांना येतो,वरील सर्व समस्याचे निवारण सत्ताधारी संचालक मंडळाने करावे,असे मत श्री. येलगार यांनी व्यक्त केले.
यावेळी पार्लमेन्ट्री बोर्ड नेते फत्तु नदाफ, तालुका नेते दिलीप पवार, सल्लागार मंडळाचे अध्यक्ष जकप्पा कोकरे, तालुका अध्यक्ष प्रमोद कोडग, सरचिटणीस गांधी चौगुले,संपर्क प्रमुख देवाप्पा करांडे,सुभाष शिंदे, नितीन वाघमारे, विठ्ठल कोळी, अजीम नदाफ, इत्यादी संघांचे पदाधिकारी उपस्थित होते.
To Top