Sanvad News कर्मचारी व शिक्षकांच्या कुटुंबियांसाठी कोविड रुग्णालय सुरू करा - विनायक शिंदे;सांगली जिल्हा परिषदेस निवेदन

कर्मचारी व शिक्षकांच्या कुटुंबियांसाठी कोविड रुग्णालय सुरू करा - विनायक शिंदे;सांगली जिल्हा परिषदेस निवेदन



सांगली जिल्हा परिषदेत कार्यरत असणारे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती कोविड-19 बाधितांसाठी जि प कोविड रुग्णालयाची सोय करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन जितेंद्र दुडी मुख्यकार्यकारी अधिकारीसो.जि.प.सांगली यांना शिक्षक संघाचे सांगली जिल्हाध्यक्ष श्री.विनायक शिंदे यांनी दिले आहे.
सध्या देशभरात कोविड-19 या संसर्गजन्य आजाराच्या साथीने गंभीर स्वरूपाचे थैमान घातले असून,या साथीच्या प्रतिबंधासाठी शासन स्तरावर युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. यासाठी आपल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी,कर्मचारी व शिक्षक वेगवेगळ्या स्तरावर अहोरात्र काम करीत असलेने ते प्रत्यक्ष काम करणारे अधिकारी, कर्मचारी व शिक्षक हे कोरोना बाधित होत आहेत.  त्यांच्या संसर्गामुळे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीही कोरोनाबाधित आढळून येत आहेत.त्यांच्यावर वेळेत उपचार होण्याच्या दृष्टीने त्यांना आवश्यक सोयी सुविधा त्वरित उपलब्ध व्हाव्यात यासाठी आपल्या जि प स्तरावर स्वतंत्र कोविड रुग्णालयाची व्यवस्था करण्यात यावी.
  आपल्या अधिपत्याखाली हे स्वतंत्र कोविड रुग्णालय उभारण्यासाठी लागणारा आवश्यक निधी जमा करणेसाठी आम्ही सर्वजण सहकार्य करू. तरी आपल्या जिल्हा परिषद मधील जे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व त्यांच्या कुटुंबातील जे कोरोना बाधित होतील त्यांच्यावरील तात्काळ उपचारासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या धर्तीवर स्वतंत्र कोविड रुग्णालय सुरू करणेसाठी आपण प्रयत्न करावेत अशी विनंती करण्यात येत आहे.
To Top