भिलवडी ता.पलुस येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँण्ड ज्युनियर कॉलेज भिलवडी मध्ये महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
नवीन शैक्षणिक वर्षांमध्ये उमेदीने कामाला लागा आणि सर्व क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन करा. शाळेचा, संस्थेचा लौकिक सर्व दूर पोहोचवा असे प्रतिपादन विश्वास चितळे यांनी केले.
यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेच्या गुणवत्ता शोध परीक्षा, ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप,राष्ट्रीय पातळीवरील चित्रकला स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थी,राज्य स्तरीय हाॅलीबाॅल स्पर्धा, राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडू,पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा संस्था पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी संस्थेचे संचालक जयंत केळकर,प्रा.धनंजय पाटील,आर. डी पाटील, संस्थेचे सचिव मानसिंग हाके, सहसचिव के. डी पाटील, मुख्याध्यापिका शुभांगी मन्वाचार, उपमुख्याध्यापक एस. एन कुलकर्णी,पर्यवेक्षक संभाजी माने, प्राचार्य डॉ. दिपक देशपांडे,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुकुमार किणीकर, इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका विद्या टोणपे,महेश पाटील सर्व विभागांचे शिक्षक, शिक्षकेतर सेवक,पालक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक नलवडे यांनी केले.