भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी मधील सन १९९३-१९९४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी मध्ये शिकणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला.भिलवडी शिक्षण संस्थेचे सचिव मानसिंग हाके अध्यक्ष स्थानी होते.
तब्बल २८ वर्षानंतर शाळेत एकत्रित जमलेल्या सावांगड्यानी जुन्या आठवणींना उजाळा दिला. गप्पा गोष्टी ,गाणी आणि धमाल करून शाळेत एक दिवस वर्गमित्रांसोबत साजरा केला.माजी विद्यार्थ्यांनी या विद्यार्थ्यांनी भिलवडी शिक्षण संस्थेस अकरा हजार रुपये देणगी दिली शाळेस ट्रॅफिक मिरर भेट दिला.या कार्यक्रमाचे सिकंदर फकीर,अविनाश शिंदे,संतोष ढवळे, सचिन देसाई, सुशांत निकम यांनी केले.या कार्यक्रमास ४६ माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या .