Sanvad News नंदकुमार खराडे यांचा तासगांव तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सत्कार..

नंदकुमार खराडे यांचा तासगांव तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सत्कार..


महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (थोरात गट प्रणित)  स्वाभिमानी शिक्षक मंडळाच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्यपदी नंदकुमार खराडे यांची निवड झाली.या निवडीबद्दल त्यांचा तासगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

तासगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे धडाडीचे नेतृत्व, माजी तालुकाध्यक्ष, यापूर्वी शिक्षक संघटनेमध्ये उत्तम संघटना वाढीसाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्याची दखल घेऊन नंदकुमार खराडे सर यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (थोरात गट प्रणित)स्वाभिमानी शिक्षक मंडळाच्या पार्लमेंटरी बोर्ड सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

यावेळी पोपटराव सुर्यवंशी राज्य कार्याध्यक्ष, विनायक शिंदे जिल्हाध्यक्ष, महेश खराडे नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना, अरूण पाटील पार्लमेंटरी बोर्ड नेते, हंबीरराव पवार राज्य उपाध्यक्ष, अविनाश गुरव जिल्हा सरचिटणीस, श्रीकांत पवार नेते, शब्बीर तांबोळी तालुकाध्यक्ष, राजाराम कदम, आनंदा उतळे, संदिप खंडागळे व इतर पदाधिकारी, शिक्षक उपस्थित होते.
To Top