भिलवडी शिक्षण संस्थेच्याइंग्लिश मिडियम स्कूल भिलवडी मध्ये बालवाडी विभागाच्या (के.जी. सेक्शन) २०२२-२०२३ नवीन शैक्षणिक वर्षाला आनंदाने व उत्साहाने प्रारंभ झाला.नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
सर्व पालक आपल्या पाल्यास घेऊन शाळेत आले होते.यावेळी शाळेचे वातावरण प्रसन्न करणारे होते.मुलांची आवड लक्षात घेवून केलेली सजावट व मुलांच्यातील शिस्त यामुळे सर्व पालक भारावून गेले . सर्व मुलांचा व पालकांच्या स्वागताचा कार्यक्रम अवर्णनीय होता.यावेळी मुलांबरोबरच पालकांचा उत्साह व आनंद उल्लेखनीय होता. यावेळी संस्थेचे संचालक श्री.जयंत केळकर, संस्थेच्या सेकंडरी स्कूल ॲड ज्युनिअर कॉलेज चे मुख्याध्यापक संजय कुलकर्णी, पालक प्रमुख सौ. लीना वहिनी चितळे,विभाग प्रमुख के.डी.पाटील,बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.स्मिता माने यांच्यासह सर्व शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थितीत होते.