पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. मुलांचा उत्साह वाढावा यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उदय परांजपे ,उपाध्यक्ष विश्वास रावळ ,संचालक सुनील रावळ,संजय परांजपे, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक टी.जे.करांडे ' मोहन सुतार ,पालक प्रतिनिधी ,सर्व शिक्षक ,शिक्षिका उपस्थित होते.
सर्व पालकांच्या वतीने शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष उदय परांजपे व आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक टी.जे करांडे यांचा सत्कार करण्यात आला. मुलांचा उत्साह दिसून आला, पालकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये उत्सुकता दिसून येत होती. सर्वजण शाळेकडे येण्यास आतुर झालेले दिसत होते. सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करुन मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. इयत्ता पाचवी ते आठवी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उदय परांजपे मुख्याध्यापक टी.जे.करांडे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख ए.के बामणे यांनी केले. पुस्तक वाटप नियोजन शिकलगार सर, कांबळे सर यांनी केले. आभार एस.डी.सावंत यांनी मानले..