Sanvad News बाबासाहेब चितळे महाविद्यालया मध्ये योग दिवस संपन्न.

बाबासाहेब चितळे महाविद्यालया मध्ये योग दिवस संपन्न.


भिलवडी शिक्षण संस्थेच्या  बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील जिमखाना विभाग , एन.एस एस विभाग व महाविद्यालयाच्या आय.क्यू. एसी . विभागाच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न झाला यावेळी या कार्यक्रमाचे आयोजक प्रा.डॉ. महेश पाटील - शारीरिक शिक्षण प्रमुख , प्रा.डॉ. व्ही.एस. विनोदकर प्रा.डॉ. एस.डी. कदम सी. न्यूजचे वार्ताहर शाशिकांत कांबळे उपस्थित होते .
     या कार्यक्रमाचे नियोजन प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी डॉ. महेश पाटील यांनी केले तसेच या कार्यक्रमासाठी योग प्रशिक्षण देण्याचे काम ही त्यांनी केले आहे. "आजच्या धावपळीच्या जगामध्ये माणूस जगण्याची धडपड करीत असल्यामुळे तो आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करीत असून तो वेगवेगळ्या रोगांना आमंत्रण देत आहे. माणसांने निरोगी आयुष्य जगायचे असेल तर त्याने योग साधना करावयास हव्या योगसाधनेमुळे अनेकांचे दुर्धर आजार बरे झाले . स्वस्थआणि सुंदर जीवन लाभले आहे . म्हणून प्रत्येकांने सुंदर जीवनासाठी योग साधना कराव्यात असे मनोगत प्राध्यापक डॉ. एस.डी. कदमसरांनी व्यक्त केले .
       हा कार्यक्रम शासकीय नियमानुसार व शासकीय ध्येय धोरणानुसार महाविद्यालयामध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमास सी . न्यूजचे वार्ताहर मा. शशिकांत कांबळे यांचे सहकार्य व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . दीपक देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले.
   या कार्यक्रमास महाविद्यायातील विद्यार्थी , प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते . कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. एस.बी. चव्हाण यांनी केले , सूत्रसंचालन डॉ. एस.डी. कदम यांनी केले तर आभार डॉ. व्ही.एस. विनोदकर यांनी मानले.
To Top