भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने बाल वारकऱ्यांची दिंडी सोहळा संपन्न झाला.माऊली... माऊली.... जय जय रामकृष्ण हरी .....ज्ञानोबा माऊली तुकाराम....च्या जयघोषात ... टाळ मृदुंगाच्या गजरात दौडणा-या आश्वा सोबत रंगलेला रिंगण सोहळा उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे,उपाध्यक्ष डॉ.बाळासाहेब चोपडे,संस्थेचे सचिव मानसिंग हाके यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून दिंडीस प्रारंभ करण्यात आला.
पारंपारिक वारकऱ्यांच्या वेशात नटून थटून आलेले ... भाळी गांधबुक्का लावलेले,भगव्या पताका व तुळशी वृंदावना सोबत सहभागी झालेले पाचशे वर बाल वारकरी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.
याप्रसंगी बोलताना संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे म्हणाले की,महाराष्ट्रात वारकरी सांप्रदायाने आषाढी वारीच्या निमित्ताने संपूर्ण जगाला मानवतेची ओळख करून दिली आहे.खाजगी मराठी प्राथमिक शाळेतील सर्व स्टाफ नेटके संयोजन केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे यांनी सर्वांचे अभिनंदन करीत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे विश्वस्त जे. बी.चौगुले, जयंत केळकर,भू. ना. मगदूम, दादासो चौगुले,खंडू आण्णा शेटे,सहसचिव के.डी.पाटील,प्राथमिक विभागप्रमुख प्रा.सौ.मनिषा पाटील,प्रा.महेश पाटील,सेकंडरी स्कूलचे माजी मुख्याध्यापक सुभाष भोकरे, मुख्याध्यापक सुकुमार किणीकर,बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.सुचेता कुलकर्णी, आदी मान्यवरांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौ.छायागायकवाड,संध्याराणी भिंगारदिवे,संजय पाटील,विठ्ठल खुटाण,शरद जाधव,अर्चना येसुगडे, सफुरा मगदूम,किरण गुरव, रुक्साना शेख,स्वाती पाटील,सारिका कांबळे,रुकैय्या पटेल, आश्विनी कोष्टी,मनिषा रांजणे आदींनी नियोजन केले.