भिलवडी
स्पर्धा परीक्षा हे आव्हान नसून कौशल्य आहे.बदलत्या काळानुसार व अभ्यासक्रमानुसार सातत्याने झोकून देऊन अभ्यास व सराव केल्यास स्पर्धा परीक्षेत निश्चित यश मिळते असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक ओंकार काकडे यांनी केले.
भिलवडी शिक्षण संस्थेच्या बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्राच्यावतीने आयोजित " स्पर्धा परीक्षा वास्तव व तयारी " या विषयावर व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते.अध्यक्ष स्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे सचिव मानसिंग हाके होते.
प्रा. रोहित शिंगे,महाविद्यालयाचे प्राचार्य 'दीपक देशपांडे , स्पर्धा परीक्षा प्रमुख डॉ. एस.बी. शिंदे आदींसह कला व विज्ञान विभागातील सर्व विद्यार्थी , प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. सुरेश शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.प्रा.आर.एच.भंडारे यांनी केले तर डॉ. एस.डी. कदम यांनी आभार मानले.