सामाजिक कार्यकर्त्या व स्व.काकासाहेब चितळे यांच्या पत्नी श्रीमती सुनिता चितळे यांनी भिलवडी शिक्षण संस्थेस तीन लाख रुपयाची देणगी दिली.भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे,उपाध्यक्ष डॉ.बाळासाहेब चोपडे यांनी देणगीचा धनादेश स्विकारला.
स्व.काकासाहेब चितळे यांनी भिलवडी शिक्षण संस्थेस विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यापूर्वी भरीव अशी अर्थिक मदत केली आहे.हीच परंपरा सुनिता चितळे यांनी पुढे सुरू ठेवली आहे.
संस्थेच्या वतीने विश्वास चितळे यांच्या हस्ते बुके देऊन सुनिता चितळे यांचा देणगी बद्दल सत्कार करण्यात आला.राज्य बुद्धिबळ संघटनेच्या उपाध्यक्ष पदी निवड झाले बद्दल उद्योजक गिरीश चितळे यांचा डॉ.बाळासाहेब चोपडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
भिलवडी शिक्षण संस्थेचे विश्वस्त नानासाहेब चितळे,सौ.पद्मजा चितळे,मकरंद चितळे,
संस्थेचे सचिव मानसिंग हाके,संचालक जयंत केळकर,संजय कदम,सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चे मुख्याध्यापक संजय कुलकर्णी,सहसचिव के.डी.पाटील,प्रा.मनिषा पाटील, बाबासाहेब चितळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिपक देशपांडे,खाजगी मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यपक सुकुमार किणीकर,इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका विद्या टोणपे,स्मिता माने आदी उपस्थित होते.