Sanvad News खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी येथे शालेय वार्षिक क्रीडा महोत्सवास प्रारंभ.

खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी येथे शालेय वार्षिक क्रीडा महोत्सवास प्रारंभ.



भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी येथे शालेय वार्षिक क्रीडा महोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला.
सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी येथील सेवानिवृत्त शिक्षक शशिकांत उंडे यांच्या हस्ते  व भिलवडी शिक्षण संस्थेचे सचिव मानसिंग हाके यांच्या अध्यक्षतेखाली मैदानाचे पूजन करण्यात आले.यावेळी प्राथमिक विभाग प्रमुख प्रा.सौ.मनिषा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी बोलताना शशिकांत उंडे म्हणाले की,खेळाच्या माध्यमातून शरीर व मनाचा सर्वांगीण विकास होतो.शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांनी खेळाशी मैत्री करावी.खेळामुळे मनाला आनंद प्राप्त होतो त्याच बरोबर कोणतेही काम सामूहिक रित्या पूर्ण करण्याची शक्ती देखील मिळते.


यावेळी बोलताना सचिव मानसिंग हाके म्हणाले की,इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपले बलस्थान ओळखून खेळाची निवड करावी.योग्य मार्गदर्शन व सरावात सातत्य ठेवले की भविष्यात त्यात नैपुण्य मिळविणे सोपे जाईल.
यावेळी मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते कबड्डीच्या मैदानाचे पूजन करून सलामीच्या सामन्याला प्रारंभ करण्यात आला.तीन दिवस विविध वैयक्तिक व सांघिक खेळाचे सामने घेतले जाणार असून शाळेच्या वतीने सूत्रबद्ध नियोजन करण्यात येत आहे.

क्रीडा विभाग प्रमुख संजय पाटील
यांनी क्रीडा महोत्सवा विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक सुकुमार किणीकर यांनी केले.सौ.प्रगती भोसले यांनी सूत्रसंचालन केले.आभार सौ. छाया गायकवाड यांनी मानले.यावेळी सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



To Top