राजेश चौगुले फाऊंडेशनचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी - सुभाष कवडे;मायबोली दीपसंध्या कार्यक्रमास अंकलखोपकरांचा प्रतिसाद
अंकलखोप प्रतिनिधी :
ज्यांचे हात आकाशाला टेकलेले असताना ,पण पाय जमिनीवर असतात अशी माणसे समाजात गरजेची आहेत. स्वतः सक्षम असताना समाजातील उपेक्षित घटकांना समृद्धी देण्यासाठी सक्षम हात समाजात निर्माण व्हावेत. जे सामाजिक काम येथील मा . राजेश चौगुले फाऊंडेशन मार्फत सुरू आहे ते महाराष्ट्राला आदर्शवत आहे,असे गौरवोद्गार ज्येष्ठ कवी व शब्दसूरचे अध्यक्ष सुभाष कवडे यांनी काढले.
येथील शब्दसूर साहित्य व सांस्कृतिक मंच व मा. राजेश चौगुले फौंडेशन यांचे वतीने मराठी भाषेला 'अभिजात दर्जा' मिळालेबद्दल व मराठी रंगभूमी दिनानिमित्त "स्वरगंध" प्रस्तुत अविट मराठी गीतांचा 'मायबोली दीपसंध्या ' बहारदार कार्यक्रम झाला यावेळी ते बोलत होते.
यावेळी सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मा. राजेश चौगुले फौंडेशन यांचे वतीने आयोजितकिल्ले बांधणी स्पर्धा २०२४ चे बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला. वैयक्तिक किल्ला विभागात: प्रथम क्रमांक- राजवीर सुशांत सूर्यवंशी द्वितीय क्रमांक -गौरवी प्रमोद सूर्यवंशी तृतीय क्रमांक- अथर्व अभिजीत गुरव, उत्तेजनार्थ - सोहम सतीश पाटील व सोहम संदीप कोळी . अनुक्रमे ३०००/-, २०००/-, १०००/- रोख रकमेसह सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आले. सांघिक किल्ला विभाग : प्रथम क्रमांक - ऐक्य गणेश मंडळ , द्वितीय क्रमांक - स्फूर्ती गणेश मंडळ, तृतीय क्रमांक बसवेश्वर गणेश मंडळ, यांना अनुक्रमे ७०००/-,५०००/-, ३०००/-रोख रकमेसह सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आले. सिद्धेश्वर गणेश उत्सव मंडळ, शिव साम्राज्य गणेश मंडळ यांना सहभागाबद्दल प्रमाणपत्र , सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळी राजेश चौगुले फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ. शीतल चौगुले यांनी दहा वर्षातील फाउंडेशनच्या कार्याचा आढावा घेतला . वृक्षारोपण व विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. किल्ल्यांचे परीक्षण करणारे सुरज चौगुले , सुबोध वाळवेकर यांच्यासह मान्यवरांचा सत्कार झाला. विजेत्या मंडळांच्या वतीने सौ . प्रणाली पाटील यांनी सलग तीन वर्षे स्पर्धा आयोजित केल्याबद्दल व मुलांना किल्ले बांधणीसाठी प्रवृत्त केले यासाठी राजेश चौगुले यांच्यासह फाउंडेशनला धन्यवाद दिले.
एव्हरेस्ट मोहीम यशस्वी केलेबद्दल डॉ. उमेश चौगुले यांचा सत्कार झाला. सूत्रसंचालन आप्पासाहेब पाटील यांनी केले. संयोजन "स्वरगंध" चे शशिकांत हजारे, फाऊंडेशनचे उपाध्यक्ष राजेंद्र कुंभार, सचिन चौगुले, आप्पासाहेब सकळे, विकास सूर्यवंशी, "शब्दसूर"चे उपाध्यक्ष राजेंद्र खामकर, सचिव प्रसाद कोळी, अनिल विभुते, बाळासाहेब मगदूम , महेश चौगुले, प्रदीप करजगार, वैभव यादव, सतीश यादव आदीनीं केले. यावेळी गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ महिला मुले उपस्थित होते.