धनगांव,बुरुंगवाडी,भिलवडीस्टेशन,हजारवाडी येथील नागरिकांशी साधला संवाद
भिलवडी प्रतिनिधी
पलूस-कडेगांव मतदारसंघातील जनतेच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर आहे. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कधीही कमी पडणार नाही अशी खात्री आ.डॉ.विश्वजीत कदम यांनी दिली.राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीचे उमेदवार आ.डॉ.विश्वजीत कदम यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ धनगांव,बुरुंगवाडी,भिलवडी स्टेशन,हजारवाडी ता.पलूस येथे भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.
पलूस-कडेगांव विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाचे पर्व अखंडित ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणणे गरजेचे आहे. त्यासाठी येत्या २० नोव्हेंबरला ‘हाताचा पंजा’ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
डॉ.कदम यांचे ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी जल्लोषात केलेले स्वागत व माता-भगिनींनी प्रेमपूर्वक औक्षण केले. त्यांनी दिलेला आशीर्वाद यामुळे यापुढील काळात मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नव्या जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली. स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांपासून आमच्या कदम कुटुंबीयांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या लोकांना भेटून अत्यानंद झाला आहे. तुमचा हा विश्वास व खंबीर साथ यापुढेही अशीच राहील हा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान आमदार कदम यांनी धनगाव येथील ग्रामदैवत श्री हनुमानाचे मनोभावे दर्शन घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून वंदन केले.पलूस तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतपाल साळुंखे ,सरपंच संदिप यादव, वसंत पवार,युवक नेते अविनाश शेळके आदींनी त्यांचे स्वागत केले. बुरुंगवाडी येथील प.पू.सद्गुरू ब्रह्मानंद महाराज समाधीचे दर्शन घेतले. यावेळी सहकारी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.