Sanvad News विकासाच्या नावाखाली सामान्य जनतेची दिशाभुल करणा-यांना जनताच धडा शिकवेल:संग्राम देशमुख

विकासाच्या नावाखाली सामान्य जनतेची दिशाभुल करणा-यांना जनताच धडा शिकवेल:संग्राम देशमुख

 


विकासाच्या नावाखाली सामान्य जनतेची दिशाभुल करणा-यांना जनताच धडा शिकवेल:संग्राम देशमुख

दुधोंडी प्रतिनिधी :

गावोगावी न केलेल्या विकास कामांचे बोर्ड लावून  विकासाचा गवगवा करण्याचा उद्योग विरोधकांनी केला आहे.त्यांचे हे कारनामे जनतेच्या समोर उघडे झाले आहेत.विकासाच्या नावाखाली बगलबच्चे पोसण्याचेच उद्योग करून सामान्य जनतेची  मात्र दिशाभूल करणा-यांना जनताच धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांनी केले.

ते दुधोंडी.ता.पलूस येथील प्रचार सभेत बोलत होते.अध्यक्षस्थानी शिवाजीराव मगर पाटील होते.  संग्राम देशमुख पुढे म्हणाले की,विरोधकांनी सत्तेचा वापर हा केवळ संस्था मोठया करण्यासाठी केला .पलूस तालुक्यातील किर्लोस्करवाडी येथे एकच कारखाना उभा राहिला तर शेकडो लघुउद्योग उदयास   येवून हजारो कुटुंबाचे संसार सुखी झाले.  किर्लोस्कर सारखे उद्योग उभारण्याऐवजी विरोधकांनी वायनरीसारखे उद्योग उभारण्याचा उद्योग केला व शेकडो एकर जमीन हडप केली.एमआयडीसीतील जागा शिल्लक राहिली असती तर उद्योगाला चालना मिळाली असती व बेरोजगारीचा प्रश्न काहीसा सुटला असता असेही संग्राम देशमुख म्हणाले.

  यावेळी शिवाजीराव मगर पाटील     म्हणाले की ,मतदार संघात परिवर्तनाची लाट आहे. सरकारी योजना घराघरात पोहचवण्यात भाजपचे कार्यकर्ते अग्रेसर आहेत. संग्राम देशमुख यांनी कुंडल प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला नवसंजीवनी देण्याचे काम केले. त्यामुळे संग्राम देशमुख याच्या पाठिशी जनता ठामपणे उभी असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. स्वागत व प्रास्तावीक मच्छिंद्रनाथ कारंडे      यांनी केले.आभार  जयवंत मगर पाटील      यांनी मानले. 




To Top