कुंभारगाव मध्ये काँग्रेसला खिंडार ; शेकडो कार्यकर्त्यांचा संग्रामसिंह देशमुख यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश
पलूस प्रतिनिधी :
केंद्रातील व राज्यातील युती सरकारने शेतकरी, कष्टकरी, उपेक्षित, महीला व सर्वसामान्य जनतेसाठी पंतप्रधान किसान सन्माननिधी, नमो किसान सन्माननिधी, लाडली बहन, शेतकऱ्यांना मोफत वीज, यासारखा अनेक लोक कल्याणकारी योजना काढल्या व त्या सर्व योजनांचा लाभ हा थेट लाभार्थ्यांना मिळाला आहे. त्यामूळे सर्वसामान्य जनता ही महायुती सरकारच्या कामगिरीवर समाधानी असल्यामुळे सर्वसामान्य जनता ही महायुतीच्या मागे ठाम आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असल्याचे प्रतिपादन २८५ पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संग्राम देशमुख यांनी केले. ते कुंभारगाव ता. कडेगाव येथील काँग्रेस पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी काँग्रेस पक्षातील नारायण साठे, अक्षय चव्हाण, रोहित चव्हाण, महेश चव्हाण, राजेश अर्जुन चव्हाण, दीपक चव्हाण, गोरख कांबळे, शेखर वायदंडे, अजय चव्हाण, राजेंद्र धुमाळे यांनी पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला.
पुढे बोलताना संग्रामसिंह देशमुख म्हणाले की पलूस कडेगांव मतदार संघात जिल्हा परिषद अध्यक्ष असताना ७०० कोटी पेक्षा जास्त निधी आणला. व दोन्ही तालुक्यातील एक ही गाव पक्ष, पार्टी न पाहता भरघोस निधी देऊन मतदारसंघाच्या विकासात भर घातली आहे. पलूस कडेगाव च्या जनतेसाठी २४ तास आमची दारे नेहमी खुली असतात त्यामुळे पलूस कडेगावची जनता यावेळी परिवर्तन घडवणार असल्याचा विश्वास देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला.या वेळी कडेगाव तालुक्यातील कुंभारगाव गावातील भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
.