Sanvad News दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ५ नोव्हेंबर रोजी श्रीक्षेत्र औदुंबर येथे होणार डॉ.विश्वजीत कदम यांच्या प्रचाराचा शुभारंभ

दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ५ नोव्हेंबर रोजी श्रीक्षेत्र औदुंबर येथे होणार डॉ.विश्वजीत कदम यांच्या प्रचाराचा शुभारंभ

 


दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ५ नोव्हेंबर रोजी श्रीक्षेत्र औदुंबर येथे होणार डॉ.विश्वजीत कदम यांच्या प्रचाराचा शुभारंभ

भिलवडी प्रतिनिधी 

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार),शिवसेना(उध्दव ठाकरे), आरपीआय(गवई गट) या महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.विश्वजीत पतंगराव कदम यांच्या जाहीर प्रचाराचा शुभारंभ श्रीक्षेत्र औदुंबर येथे मंगळवार दि.५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ठीक ४ वा.होणार असल्याची माहिती काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आली.

माजी आमदार मोहनराव (दादा) कदम यांच्या अध्यक्षतेखाली प्रचार शुभारंभ संपन्न होणार आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील,खा.सुप्रिया सुळे,खा.प्रणिती शिंदे,खा.विशाल पाटील, आ.अरुण (आण्णा) लाड, आ.विक्रम सावंत,सौ.पूजा विशाल पाटील,ममता सपकाळ,सौ.स्वप्नाली विश्वजीत कदम आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या प्रचार शुभारंभासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

To Top