Sanvad News पदवी नसणाऱ्यांनाही अॅपल-गुगलमध्ये नोकरीची संधी

पदवी नसणाऱ्यांनाही अॅपल-गुगलमध्ये नोकरीची संधी

पदवी नसणाऱ्यांनाही अॅपल-गुगलमध्ये नोकरीची संधी
मुंबई : पदवी मिळवलात तर तुम्हाला चांगली नोकरी मिळेल असं आपल्याकडे सांगितली जातं. पण आता तुमच्याकडे पदवी नसतानाही अॅपल, गुगल सारख्या बड्या कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. असं असलं तरीही तुमच्याकडे काही गुण असणं गरजेचं असतं. जॉब सर्च साइट ग्लासडोरने अशा अनेक कंपन्यांची लिस्ट बनवलीय. यामध्ये गुगल, अॅपल आणि आयबीएम सारख्या कंपन्या आहेत. कोणतीही पदवी नसली तरीही तुम्ही या कंपन्यांसाठी नोकरीसाठी अर्ज करु शकता. 
अमेरिकेत जी कंपनी जॉबसाठी उमेदवार घेते त्यातील 15 टक्के लोकांकडे पदवी नसते असं 2017 मध्ये आयबीएमचे प्रमुख जोआना डाली यांनी सांगितलं होतं. पदवी शिवाय एखाद्या क्षेत्राचा अनुभवही आहे का ? हेदेखील इथं पाहीलं जातं.एपल - डिझाइन वेरिफिकेशन इंजीनियर, इंजीनियरिंग प्रोजेक्ट मॅनेजर 
पेंगुइन - मार्केटींग डिझाइनर, माध्यम सहाय्यक, अर्थसंकल्पाचे वरिष्ठ व्यवस्थापक, उत्पादन सहाय्यक
हिल्टन  - इव्हेंट मॅनेजर, फ्रंट ऑफिस मॅनेजर, हाउसकीपर, हॉटेल मॅनेजर
To Top