ई-स्कूल टाईम्स या डिजिटल शैक्षणिक व्यासपीठावर सर्व विद्यार्थी,शिक्षक,पालक,संस्था चालक मंडळींचे हार्दिक स्वागत.ई-स्कूल टाईम्स म्हणजे कोणत्यातरी वृत्तपत्राचा ब्लॉग असावा अशी भावना प्रथमदर्शनी आपणा सर्वांची झाली असावी.कारण एखादा कार्यक्रम झाला की त्याची सिंगल किंवा डबल कॉलम प्रसिध्दी झाली की तो उपक्रम फाईल बंद होतो.पण आमच्या टीमला हे अपेक्षित नाही.
शाळा,महाविद्यालये राबवित असलेले वैशिष्ठ्यपूर्ण उपक्रम,विविध स्पर्धा परीक्षेत यशस्वी होणारे विद्यार्थी,त्यांनी केलेल्या प्रयत्नांची दिशा,उपक्रमशील गुरुजन,शिक्षण संस्था राबवित असलेले उल्लेखनीय शैक्षणिक धोरण,शासनाने निर्धारित केलेल्या चाकोरीबद्ध कार्यक्रमा व्यतिरिक्त आपण निश्चित वेगळे काही प्रयोग केले असतील,शिक्षण विषयाशी निगडीत असलेले शिक्षकांचे अनुभव कथन,लेख आदी सर्व बाबींची या व्यासपीठाला प्रतिक्षा राहील.

बदलत्या काळानुसार, बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार ई-स्कूल टाईम्स च्या माध्यमातून वैश्विक पातळीवर,सकारात्मक शैक्षणिक विचारांची देवाघेवाण करणे ही आमची भूमिका आहे.ई-स्कूल टाईम्स कडे आम्ही एक सहशालेय किंवा शिक्षण पूरक उपक्रम म्हणून ही पाहतो.त्यावर व्यक्त होण्यासाठी आपणास शाळा,महाविद्यालय या आपल्या कार्यक्षेत्रा पेक्षाही मोठा परीघ आमची टीम उपलब्ध करून देत आहे.आमच्या ध्येय धोरणा नुसार वेळोवेळी शिक्षक,विद्यार्थी,पालक यांसाठी विविध स्पर्धा,उपक्रम,भरगच्च अशा मार्गदर्शनाचा खजिना घेवून आम्ही आपणाशी सातत्याने संवाद साधणार आहोत.या शिक्षण संवाद सेतू मध्ये आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.
- संपादक सौ.दिपाली जाधव