Sanvad News सविता सत्याण्णा यांना आदर्श शिक्षक पुरस्कार; पलूस तालुका पंचायत समितीच्या वतीने गौरव

सविता सत्याण्णा यांना आदर्श शिक्षक पुरस्कार; पलूस तालुका पंचायत समितीच्या वतीने गौरव

      

पलूस तालुका पंचायत समितीच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा भिलवडी येथील सहाय्यक शिक्षिका सविता सुनिल सत्याण्णा यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.पलूस तालुका पंचायत समितीचे सभापती दिपकराव मोहिते,उपसभापती अरुण पवार,जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. भिलवडी शिक्षण संस्थेच्या बाबासाहेब चितळे सभागृहामध्ये भिलवडी,अंकलखोप,  वसगडे, आमणापूर  या चार केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक,खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील सात शिक्षकांना सन २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षासाठी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.स्मृती चिन्ह,सन्मानपत्र,शाल,श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.


प्रास्ताविक व स्वागत गटशिक्षणाधिकारी प्रसाद कालगावकर यांनी केले. सूत्रसंचालन शरद जाधव यांनी तर आभार भिलवडी केंद्राचे केंद्रप्रमुख अशोक कोळेकर यांनी मानले.यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक डी.के.किणीकर,संजय कदम,प्राथमिक विभागप्रमुख प्रा.सौ.मनिषा पाटील,
शिक्षणविस्तार अधिकारी माधुरी गुरव,शिक्षक समितीचे नेते बाबासाहेब लाड,खाजगी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुकुमार किणीकर, सेकंडरी स्कूल भिलवडीचे पर्यवेक्षक संभाजी माने,संजय मोरे,बाजीराव सावंत,राजेंद्र कांबळे,उदयकुमार  रकटे,प्रदिप मोकाशी,विषय तज्ञ धनंजय भोळे,अरुण कोळी,सागर कदम आदी मान्यवरांसह शिक्षक,शिक्षणप्रेमी उपस्थित होते.


To Top