Sanvad News शिक्षकांचे सर्व प्रलंबित प्रश्न निकालात काढू - शरदचंद्रजी पवार यांची ग्वाही; प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टंडळाने घेतली बारामती येथे भेट.

शिक्षकांचे सर्व प्रलंबित प्रश्न निकालात काढू - शरदचंद्रजी पवार यांची ग्वाही; प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टंडळाने घेतली बारामती येथे भेट.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष  मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांची शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत भेट घेतली.महाराष्ट्रातील प्राथमिक  शिक्षकांचे सर्व प्रलंबित प्रश्न संबंधित खात्याचे मंत्री,प्रशासकीय अधिकारी वर्ग व शिक्षक संघाचे पदाधिकारी यांच्यासोबत मंत्रालयात बैठक घेऊन निकालात काढू अशी ग्वाही मा.शरदचंद्रजी पवार यांनी दिली.
प्राथमिक शिक्षकांच्या विषय शिक्षक पदवीधर वेतनश्रेणी, शिक्षण सेवक मानधन वाढ, महानगरपालिका शिक्षकांचे विविध प्रलंबित प्रश्न यांच्यासह विविध प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने गोविंदबाग बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद चंद्रजी पवार यांची भेट घेतली.शिक्षक संघाचे राज्य नेते संभाजीराव थोरात (तात्या) यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी बोलताना शरदचंद्रजी पवार साहेब यांनी संबंधित खात्याचे मंत्री, सचिव यांच्याबरोबर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळांची येत्या आठवड्यात मंत्रालयात बैठक लावून सर्व प्रश्न निकाली काढण्यात येतील असे आश्वासन मा.संभाजी (तात्या) थोरात यांना दिले. यावेळी अनेक प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी पुणे जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे, नगरचे आबासाहेब जगताप, सांगली जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष विनायक शिंदे, सरचिटणीस अविनाश गुरव, भोरचे भीमराव शिंदे, खानापूर तालुकाध्यक्ष संतोष जगताप, तासगाव तालुकाध्यक्ष शब्बीर तांबोळी,न.पा.विटाचे अध्यक्ष माणिक कांबळे, चंद्रकांत कांबळे भगवान कोर, किरण सोनी, अन्वर मुजावर यांच्यासह सांगली व पुणे शिक्षक संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
To Top