पुस्तके जगण्याला बळ देतात,विद्यार्थ्यांनी वाचनाला महत्त्व द्यावे प्रतिपादन कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापक मराठी साहित्य परिषद शाखा पलूसचे अध्यक्ष संतोष काळे यांनी केले.पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक टी.जे.करांडे होते.मान्यवरांचे हस्ते कविवर्य वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन काळे करण्यात आले.
यापुढे बोलताना प्रा.संतोष काळे म्हणाले की,
मराठी साहित्यामध्ये अनेक पुस्तकांचा खजिना आहे.नामवंत साहित्यिकांनी आपल्या लेखणीने मराठी भाषा समृद्ध केलेली आहे. कुसुमाग्रजांची कवितेवर अपार निष्ठा होती. स्वातंत्र्याप्रती जागृती करणाऱ्या गीतांप्रमाणेच त्यांनी अनेक गीतेही लिहिली, हे त्यांचे वेगळेपण होते. त्यांच्या कवितांतून आजच्या तरुणाईला प्रबोधनात्मक वळण नक्कीच मिळेल.मराठीसाठी मराठी माणसाने गतिशील राहिले पाहिजे तरच मराठी गतिशील राहील. मराठी जागतिक भाषा होत आहे. जगातून नवे शब्द स्वीकारणे, स्वत:ची अभिव्यक्ती अधिक समृद्ध करणे हे काम करावे लागणार आहे असे सांगितले. स्वरचित कवितांचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.
मुख्याध्यापक टी.जे.करांडे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी दररोज जास्तीत जास्त मराठी शब्दाचा वापर करावा. मराठीमध्ये समृद्ध असे ज्ञान भांडार आहे.या ज्ञान भांडाराचा विद्यार्थ्यांनी उपयोग करून घ्यावा. वाचनप्रेमी असावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
कु.हर्षदा यमगर,कु.प्राजक्ता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात भाषा विषयक विद्यार्थ्यांच्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ज्युनिअर विभाग प्रमुख चव्हाण,पुदाले,शिकलगार,सौ.नरुले,सौ.साळुंखे,सौ.कोळी,सौ.कुलकर्णी,सर्वशिक्षक,शिक्षिका,विद्यार्थी,विद्यार्थिनी उपस्थित होते.
निवेदन सौ.एस.आर.सांळुखे यांनी आभार सौ.एस .एस. कोळी यांनी मानले.