जागरूक नागरिक बनण्यासाठी तरुण पिढीने संविधानाचे वाचन करून ते जाणून घ्यावे,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली शिकवण प्रत्यक्ष आचरणात आणावी असे प्रतिपादन भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक गिरीश चितळे यांनी केले.
भिलवडी शिक्षण संस्थेच्या बाबासाहेब चितळे महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित पोस्टर्स प्रदर्शन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.गिरीश चितळे यांच्या शुभहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि डॉ आंबेडकरांच्या जीवनातील महत्वाच्या प्रसंगांच्या पोस्टर्स आणि घटनांचे प्रदर्शनाचे देखील उदघाटन करण्यात आले.
प्राचार्य डॉ.दीपक देशपांडे,डॉ. श्रीकांत चव्हाण,प्रा. विश्वास यादव यांनी संयोजन केले.या प्रसंगी संस्था सचिव मानसिंग हाके,सहसचिव के.डी.पाटील,महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी , कला आणि विज्ञान विभागातील सर्व शिक्षक उपस्थित होते .