पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.. विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने पलूस शहरातून सायकल फेरी काढण्यात आली.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात भाषा विषयक विद्यार्थ्यांच्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. सायकल रॅलीचा शुभारंभ प्रसंगी सर्वांचे स्वागत बाळासाहेब चोपडे यांनी केले .
यावेळी बोलताना मुख्याध्यापक टी.जे.करांडे म्हणाले मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले करण्यात आले .आज सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या सायकल रॅलीच्या माध्यमातून सर्व नागरिकांना वाचनाचे महत्त्व समजावून सांगणे हा मुख्य उद्देश आहे.मराठी भाषेच्या डोळस वापराकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता प्रतिपादित केली.
ही सायकल रॅली पलुस शहरातून काढण्यात आली पलूसकर विद्यालया पासून निघालेली ही रॅली पलूस मुख्य चौकातून- पलूस सहकारी बँक - हुतात्मा स्मारक कुंडल वेस- पलूसकर चौक -पलूस गावतळे यामार्गे काढण्यात आली हुतात्मा स्मारक या ठिकाणी पलूस नगरपरिषद गटनेते सुहास पुदाले यांनी या रॅलीस शुभेच्छा दिल्या. विद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.
.संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे साहेब सर्व संचालक मंडळ यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित केलेल्या सर्व उपक्रमाचे कौतुक केले.
या सायकल रॅलीची सुरुवात मुख्याध्यापक टी.जे.करांडे , पालक प्रतिनिधी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे शिक्षणतज्ञ मोहन सुतार सदस्या शांताताई यमगर, गणेश माने, बाळासाहेब चोपडे , सुनिल पुदाले, सौ.प्रिती नरुले,सौ.अमिता कुलकर्णी, सर्व शिक्षक,शिक्षिका,विद्यार्थी,विद्यार्थीनी उपस्थित होते