महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक परिषद संघटनेच्या पुणे विभागीय संघटक पदी बाळासाहेब कटारे यांची निवड करण्यात आली आहे.शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष व माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे यांनी सदर निवडीचे पत्र ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज येथे आयोजित बैठकीत बाळासाहेब कटारे यांना दिले.
२०१८ पासून खाजगी प्राथमिक शिक्षक परिषद सांगली या संघटनेच्या माध्यमातून शाळा व शिक्षकांसाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर पुणे विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याची माहिती भगवानराव साळुंखे यांनी दिली.
शाळा व शिक्षकांच्या न्याय व हक्कासाठी आपण वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार व सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे कार्यरत राहून नवीन पदाची जबाबदारी पार पाडू असे प्रतिपादन यावेळी बाळासाहेब कटारे यांनी केले.
या निवडीबद्दल त्यांचा भगवानराव (आप्पा)साळुंखे व गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन व्हनखंडे यांच्या हस्ते बाळासाहेब कटारे यांचा अभिनंदन पर सत्कार करण्यात आला.पुणे विभागातील संघटनेचे पदाधिकारी,शिक्षक,शिक्षणप्रेमी मान्यवरांकडून बाळासाहेब कटारे यांचे अभिनंदन होत आहे.
यावेळी रामराव पाटील, संघटनेचे सांगली जिल्हा कोषाध्यक्ष संतोष जाधव,सांगली,मिरज, कुपवाड महानगरपालिका क्षेत्र अध्यक्ष व जिल्हा प्रवक्ते उदयसिंह भोसले,मिरज तालुका अध्यक्ष अनिल उमराणी,आरिफ गोलंदाज,संगिता पाटील,सौ. प्रेमला पाटील,सौ.सविता पाटील,दिपक संकपाळ,कमलाकर मिसाळ,दिपक सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.